जिल्हासामाजिक

राजे क्लबच्या पाठपुराव्याला यश शेवाळवाडीत नवीन पोलीस चौकीला शासनाची मंजुरी…

शेवाळवाडी (हडपसर) : शेवाळवाडी परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, शेवाळवाडी येथे नवीन पोलीस चौकी सुरू करण्यास शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळवण्यासाठी राजे क्लबकडून फेब्रुवारी २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात राजे क्लबने पोलीस आयुक्त कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदने सादर करत सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच पोलीस चौकीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएल प्रशासनाशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. या समन्वयात्मक प्रयत्नांमुळे शेवाळवाडी पोलीस चौकीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचून त्याला मंजुरी मिळाली.

या संपूर्ण प्रक्रियेत पुरंदर-हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे राजे क्लबकडून नमूद करण्यात आले आहे.

नवीन पोलीस चौकीच्या मंजुरीची अधिकृत घोषणा तसेच उद्घाटन समारंभ आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

या नवीन पोलीस चौकीमुळे शेवाळवाडी व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसेल, तसेच नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखली जाईल, असा विश्वास राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व मा. उपसरपंच अमित अण्णा पवार यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पोलीस चौकी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, राजे क्लबच्या या यशस्वी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??