आरोग्यमहाराष्ट्र

राजकीय वजन वापरा, मंत्रालयात ‘ओळख’ वापरून बदली रद्द करत पुन्‍हा जिल्हात बस्तान ; आता मनोरुग्‍णांवर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार होणार… अजब गजब सरकार

पुणे : सरकारी कर्मचारी, अधिकारी यांची दर तीन ते चार वर्षांनी बदली होणे अपेक्षित असते. तोच नियम आरोग्‍य विभागातील डॉक्‍टरांनाही लागू आहे. परंतु जिल्‍हा रुग्‍णालयात काही डॉक्‍टर व अधिकारी गेली १२ ते १५ वर्षे एकाच जागी ठाण मांडून बसले आहेत.

पुणे सुटता सुटाना… 

त्‍यांची बदली दुसरीकडे केली, तरी ते थेट मंत्रालयात ‘ओळख’ वापरून आठवड्यातच बदली रद्द करतात. कोणी मनोरुग्‍णालयात बदली करून घेत, तर कोणी प्रतिनियुक्‍तीवर जिल्‍हा रुग्‍णालयात येत. त्‍यामुळे इतर पात्र डॉक्‍टरांनी केवळ ग्रामीण भागातच सेवा बजावायची का, असा प्रश्‍न या डॉक्‍टरांकडून आणि आरोग्‍य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्‍या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात आरोग्‍य विभागाने जिल्‍हा शल्यचिकित्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, विशेषज्ञ या संवर्गांतील अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या केल्‍या. या बदल्‍या सचिवांच्‍या आदेशाने होतात. त्‍यात जिल्‍हा रुग्‍णालयात गेल्‍या १५ वर्षांपासून असलेल्या अस्थिव्‍यंगोपचार तज्‍ज्ञांची साताऱ्यातील सामान्‍य रुग्‍णालयात बदली झाली होती. परंतु, त्‍यांनी आठवडाभरातच मंत्रालयात ‘ओळख’ वापरून ती बदली रद्द करत पुन्‍हा जिल्‍हा रुग्‍णालयात आले. तसेच, तत्‍कालीन अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांची बदली जुन्‍नर येथील ग्रामीण रुग्‍णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर झाली होती. मात्र त्यांनी जिल्‍हा रुग्‍णालयातीलच सरकारी निवास अद्याप सोडलेले नाही. तसेच त्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात आठवड्यातील दोन दिवस असतात, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.

मनोरुग्‍णांवर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार…

जिल्‍हा रुग्‍णालयातील महिला बालरोगतज्‍ज्ञांची बदली नंदुरबारला झाली होती. त्‍यांनी ती रद्द करून पुन्‍हा येरवडा प्रादेशिक मनोरुग्‍णालयात वैद्यकीय अधिकारी पदाची जागा पटकावली, तर अतिदक्षता विभागतज्‍ज्ञांची बदली सातारा येथे झाली होती. त्‍यांनीही येरवडा मनोरुग्‍णालयात बदली करून घेतली. आता ते प्रतिनियुक्‍तीवर जिल्‍हा रुग्‍णालयात तीन दिवस असतात. इतर डॉक्‍टरांचीही बदली दुसरीकडे झाली. परंतु त्‍यांची ‘वर’पर्यंत पोहोच नसल्‍याने त्यांनी बदल्या निमूटपणे स्‍वीकारल्या. हा प्रकार म्‍हणजे आरोग्‍य खात्‍याचा दुटप्‍पीपणा असल्‍याचा आरोप आरोग्‍य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी केला.

निपुन विनायक, सचिव, सार्वजनिक आरोग्‍य विभाग पुढे म्हणाले..

या बाबतच्‍या प्रकरणांची अधिक चौकशी करण्‍यात येणार आहे. तसेच याबाबत पुण्‍यातील एका डॉक्‍टरची बदली ही गडचिरोली येथे करण्‍याची शिफरास केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??