जिल्हासामाजिक

वार्षिक वनभोजन उत्सवात भक्तीभावाने चिंब झाले लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती गावकरी! पाहा व्हिडिओ…

पुणे (हवेली) : परिसरात समाधानकारक पाऊस व्हावा म्हणून वरुणराजाची प्रार्थना करत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने आज पारंपरिक वनभोजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही भक्तीभावात पार पडली.

ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची पालखी पारंपरिक रीतीने जुन्या मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात आली. पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण, विविध संतांचे अभंग, आणि आबालवृद्धांची भक्तीमय उपस्थिती यामुळे सुमारे सात किलोमीटरचा प्रवास अधिकच भावपूर्ण झाला.

रामदरा येथील राममंदिरात आरती आणि डोंगरावरील गोवर्धन पर्वताची पूजा झाली. यानंतर महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गरम भात, आमटी, शिरा, जिलेबी आणि लाडूंबरोबरच भाविकांनी आपापल्या घरातून आणलेल्या पुरणपोळ्यांचाही एकमेकांना आग्रह केला.

परतीच्या मार्गावर अंबरनाथ, महादेव, विठ्ठल आणि मारुती मंदिरात आरत्या झाल्या. अखेरीस पालखी जुन्या मंदिरात पोहोचताच आरती झाली आणि वनभोजन उत्सवाची सांगता करण्यात आली.

आज दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. रिमझिम पावसात चिंब भिजत भाविकांनी भक्तिरसात न्हाऊन निघाले.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??