जिल्हासामाजिक

अंबिका नवरत्न मित्र मंडळ, कवडी माळवाडीचा गणेशोत्सव उत्साहात आगमन, आणि थोडक्यात रुपरेषा…

पुणे (हवेली) :‌ कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील कवडी माळवाडी गावातील अंबिका नवरत्न मित्र मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे आधारस्तंभ परशुराम हरिभाऊ चव्हाण, अध्यक्ष आबासाहेब साहेबराव चव्हाण व उपाध्यक्ष भाऊसाहेब विठ्ठल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाचा शुभारंभ 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश प्राण प्रतिष्ठापनेने झाला. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दररोज महिला व लहान मुलांसाठी वेगवेगळे मनोरंजक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

विशेषतः सोमवार, दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सत्यनारायण महापूजा होणार असून त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केला आहे. यासाठी गावातील तसेच परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

गणेशोत्सवाचा समारोप मंगळवार, दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता सुरू होणारी ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगणार असून गावातील तरुणाईसोबत सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

गावकऱ्यांच्या सहभागातून आणि उत्साहातून या वर्षीचा गणेशोत्सव अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??