राजकीयसामाजिक

लोणी काळभोरमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाईपलाईन कामाचा शुभारंभ…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी तीव्र उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर रायवाडी टाकेमाळ व लोणी काळभोर गाव येथे नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी प्रशांत काळभोर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे), नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, ज्ञानेश्वर ना. काळभोर (माजी चेअरमन, वि.वि. सेवा सहकारी सोसायटी), प्रताप शं. बोरकर (माजी चेअरमन, सहकारी बँक), बाळासाहेब ज. काळभोर, सुभाष काळभोर, पांडुरंग केसकर (माजी ग्रामपंचायत सदस्य), गुरुदेव काळभोर (चेअरमन, वि.वि. सेवा सहकारी सोसायटी), अमोल कोळपे (उपाध्यक्ष), सुभाष काळभोर (संचालक), रमेश भोसले (शिवसेना जिल्हा संघटक), युवराज काळभोर (अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती) यांच्यासह प्रशासक सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, माजी सरपंच राजाराम बापू काळभोर, राहुल भाऊ काळभोर, ग्रामपंचायत अधिकारी एस. एन. गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच गिताराम लांडगे, सचिन काळभोर, रमेश काळभोर, नितीन जगताप, सचिन काळभोर, सतीश काळभोर, नेता केसकर, सुधीर काळभोर, अक्षय बोरकर, अमित शेवाळे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. नव्या पाईपलाईनमुळे रायवाडी टाकेमाळ व लोणी काळभोर गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??