जिल्हाराजकीयसामाजिक

नागपूर दीक्षा भूमी यात्रेला लोणीकंद–पेरणे परिसरातून भव्य प्रस्थान

लोणीकंद–पेरणे (हवेली) : प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित नागपूर दीक्षा भूमी यात्रेला पेरणे येथील गोल्डन पॅलेससमोरून भव्य प्रस्थान मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील आंबेडकर अनुयायी तसेच विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यात्रेचे स्वरूप अधिक भव्य बनवले. यात्रेच्या प्रस्थान सोहळ्यात पुणे–हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रविंद्र नारायण कंद यांनी पै.किरण साकोरे यांच्या सर्व समाज, जाती–धर्मांना एकत्र घेऊन जाणाऱ्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, काशी–अयोध्या यात्रेनंतर आता नागपूर दीक्षा भूमी यात्रेचे आयोजन हा अत्यंत प्रशंसनीय उपक्रम असून नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी देणे ही अत्यंत सामाजिक बांधिलकीची बाब आहे.

२१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता यात्रेला सुरुवात झाली. भगवान गौतम बुद्धभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, बुद्ध वंदना आणि पुष्पहार अर्पण करून यात्रेला पवित्र सुरुवात देण्यात आली. “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यात्रेसाठी ट्रॅव्हल बसेस, भोजन व्यवस्था, निवास, वैद्यकीय मदत, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा अशा सर्व सोयींची परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. आंबेडकर अनुयायी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

या यात्रेचे आयोजन आमदार ज्ञानेश्वर कटके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, पै.संदीप भोंडवे, चेअरमन सुभाष जगताप, ज्ञानेश्वर वाळके, रविंद्र कंद, शंकर भुमकर, संजीवनी कापरे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रस्थान सोहळ्यास श्रीकांत कंद, सुनील वागस्कर, भाऊसाहेब झुरुंगे, बापूसाहेब शिंदे, ओंकार कंद आदी मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेला शुभेच्छा दिल्या.

यात्रेबाबत प्रतिक्रिया देताना फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर म्हणाले की, प्रदिपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पै.किरण शेठ साकोरे यांनी यात्रेची अत्यंत उत्कृष्ट तयारी केली आहे. काशी–अयोध्या यात्रेसारखीच दीक्षा भूमी यात्राही नियोजनबद्ध झाली असून यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय न होण्यासाठी सर्व सोय पूर्णत्वास नेण्यात आली आहे. नागरिक समाधानी असून किरण शेठ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

ही यात्रा सामाजिक ऐक्य, बंधुभाव, समता आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करणारी ठरली असून प्रस्थानाच्या वेळी जमलेल्या जनसमुदायामुळे लोणीकंद–पेरणे परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??