जिल्हासामाजिक

आनंदनगर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

संपादक डॉ. गजानन टिंगरे 

आनंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज २ ऑक्टोबर रोजी ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की, कलिंगाचे युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवत शांती, अहिंसा, प्रेम, दया या मूलतत्त्वांनी युक्त असा “बौद्ध धर्म” स्वीकारला. स्वतःवर विजय मिळवल्याने या दिवसाला “विजयादशमी” असे म्हणतात. याच दिवशी सम्राट अशोकाने मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी जगभर पाठवले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिमापूजनाची संधी स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश काका कापडी, आनंदनगर ग्रामपंचायतचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे व्हॉइस चेअरमन रोहित दादा मोहोळकर, जंक्शन गावचे लघुउद्योजक रामेश्वर तात्या माने आणि आनंदघन सोसायटीचे नूतन सचिव उदय देशमुख यांना लाभली.

या प्रसंगी कुंडलिक सोनवणे यांनी सामूहिक धम्मवंदना सादर केली. कार्यक्रमात मेजर गोविंद कांबळे (वंचित बहुजन आघाडी), एडवोकेट विकास पवार, राजेंद्र जाधव सर, अविनाश कसबे (माजी वन अधिकारी), संतोष कांबळे (बहुजन समाज पार्टी), हनुमंत कांबळे, शिवाजी तुपे तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक –

डॉ. संजीव लोंढे (सदस्य, पंचायत समिती इंदापूर)

संतोष तुकाराम कांबळे (कोषाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य)

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??