कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे ही प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही ; संचालक प्रशांत काळभोर

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथे सभापती प्रकाश जगताप हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप संचालक प्रशांत काळभोर यांनी केला आहे. “बाजार समिती ही सभापतींची वैयक्तिक जहागिरी नाही,” अशा शब्दांत प्रशांत काळभोर यांनी प्रकाश जगताप यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले की, “वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख व अहवाल संचालक मंडळाच्या मंजुरी शिवाय निश्चित करण्यात आला. आमदार चेतन तुपेबापूसाहेब पठारे यांचे फोटो अहवालातून वगळण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांच्या ऐवजी २५ लाखांचा निधी परस्पर निर्णयाने दिला. सभापतींनी चेक वितरण कार्यक्रमातही कोणत्याही संचालकांना सहभागी करून घेतले नाही. हा एकतर्फी आणि स्वार्थीपणाचा प्रकार आहे.”

काळभोर यांनी पुढे सांगितले की, “यशवंत सहकारी साखर कारखान्यासोबतच्या जमीन खरेदीसंबंधीचा एमओयू सुद्धा संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय करण्यात आला आहे. समितीमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून, या गैरकारभाराबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांना लवकरच माहिती देणार आहोत.”

दरम्यान, सभापती प्रकाश जगताप यांनी सर्व आरोप फेटाळले. त्यांनी प्रत्युत्तरात म्हटले की,

प्रशांत काळभोर यांची उपसभापती होण्याची महत्वाकांक्षा अपुरी राहिल्याने ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मी सभापतीपद सांभाळत आहे. यापूर्वी अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. बाजार समितीच्या प्रत्येक बैठकीत ते उपस्थित असतात आणि सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला २५ लाखांचा निधी कार्योत्तर मंजुरीने देण्यात आला आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत.”

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??