जिल्हासामाजिक

पुणे-सोलापूर महामार्गाचा ‘महाजाम’! नक्की गुपीत काय?

हडपसर–थेऊर फाट्या दरम्यान नित्याची वाहतूक कोंडी ; पठाणी वसुली, पोलिसांचा नाकर्तेपणा आणि मंगल कार्यालय येथील वाहन पार्किंग ठरली कारणीभूत...

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते थेऊर फाट्या दरम्यान दररोजची वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत करत आहे. वाहतूक पोलिसांचा निष्क्रियपणा, पठाणी वसुली आणि महामार्गालगतची अनियंत्रित मंगल कार्यालये हे या कोंडीचे प्रमुख कारण बनले आहेत. नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा, रुग्णवाहिकांतील अडकलेले रुग्ण आणि पोलिसांच्या नाकर्तेपणाने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी हडपसर ते लोणी काळभोर दरम्यान तब्बल सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका या जाममध्ये अडकल्या. दोन ते तीन तास नागरिकांना हाल सोसावे लागले, तरीही वाहतूक पोलिस मात्र त्या ठिकाणी गायब असल्याचे चित्र दिसून येत होते.

“वाहतूक नाही, सगळं सुरळीत” – वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बेजबाबदार दावा…

वाहतूक कोंडीबाबत विचारले असता, पुणे वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने “कोठेही ट्रॅफिक जाम नाही, दावा खोटा” असा बेजबाबदार प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांचा त्रास प्रत्यक्ष पाहूनही प्रशासनाचे हे दुर्लक्ष संतापजनक आहे.

वसुलीवर भर, नियमांची पायमल्ली का?

हडपसर गाडीतळ, १५ नंबर चौक, शेवाळे वाडी, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर, थेऊरफाटा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची पठाणी वसुली उघडपणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना लक्ष्य करून “मोबाईल मध्ये फोटो काढा, दंड लावा” हे नवे तंत्र राबवले जात आहे. या अवाजवी दंडामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आर्थिक झळ व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

“गुंडगिरीवर सर्जिकल स्ट्राईक ठीक, पण वाहतूक पोलिसांवरही गरज!”

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडगिरीविरोधात सर्जिकल स्ट्राईक जाहीर केला असला, तरी पूर्व हवेलीतील नागरिकांचा प्रश्न वेगळाच आहे — वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि भ्रष्टाचारावरही सर्जिकल स्ट्राईक होणार का? अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Vip नंबर, व्यावसायिकांचे वाहन कुणी अडवणार?

लोणी स्टेशन चौक, ज्वेलर्स व हॉटेल्स परिसरात महामार्गावरच वाहन पार्किंग सुरू असते. पोलिस मात्र मौन बाळगून बघ्याची भूमिका घेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

‘सातच्या आत सुखरूप घरात’ – वाहतूक पोलिसांचे नवीन धोरण

सकाळी नऊला सेल्फी पाठवून अनेक पोलिस कर्मचारी ड्युटीवरून गायब होतात. दुपारी जेवणानंतर बऱ्याच वेळा ठिकाणावर अनुपस्थित थेट सायंकाळी चार वाजता हजर राहतात. संध्याकाळी वाहतूक सर्वाधिक असतानाही सातच्या आत सर्व पोलिस गायब! नागरिकांना मात्र दोन ते तीन तासांच्या जाममध्ये अडकून राहावे लागते.

नागरिकांची मागणी – “नाकर्त्या, वसुलीप्रेमी वाहतूक पोलिसांवर कारवाई करा!”

पुणे-सोलापूर महामार्गावरच्या दैनंदिन कोंडीस जबाबदार असलेल्या वाहतूक पोलिसांवर तातडीने कारवाई करून शिस्त आणावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. वाहतूक नियमनावर लक्ष न देता, वसुली आणि सुट्ट्यांच्या आड वाहतूक ठप्प ठेवणाऱ्या पोलिसांवर आता कठोर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची वेळ आली आहे.

Editer Sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??