क्राईम न्युज

लोणी काळभोरात पुन्हा राडा; वडिलांना मारहाण का केली असा जाब विचारणाऱ्या मुलास दगडाने ठेचले ; दोघांविरोधात गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : पठारेवस्ती परिसरात एका तरुणाला त्याच्या वडिलांवरील मारहाणीचा जाब विचारण्याचा प्रयत्न महागात पडला आहे. तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव यशवंत रोकडे (वय २०, रा. वार्ड क्र. ४, पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य कांबळे (वय २२) आणि सुशांत दगडे (वय 23, रा. पठारेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१५ ते ११.३० च्या सुमारास भगवा चौक, पठारेवस्ती येथे घडली.

घटना कशी घडली?

गौरव रोकडे हे घरी असताना त्यांना परिचित नितीन नाईकवाडे यांनी फोन करून “तुझ्या वडिलांना काही मुले मारहाण करत आहेत” अशी माहिती दिली. हे समजताच गौरव तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे आदित्य कांबळेसुशांत दगडे हे त्यांच्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहताच त्यांनी कारण विचारले. मात्र आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकता शिवीगाळ करत गौरव यांना धक्काबुक्की केली, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गौरव यांचा मानलेला भाऊ दत्ता धायगुडे हा आला असता त्यालाही “मध्ये पडल्यास सुट्टी देऊ” अशी धमकी दिली. थोड्या वेळात परिस्थिती चिघळत असताना आदित्य कांबळे याने जमिनीवर पडलेला दगड उचलून थेट गौरवच्या डोक्यात वार केला. यात गौरव गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.

यानंतर आरोपींनी बिट्टू कोल्हापुरे आणि आकाश म्हस्के या दोघांना बोलावून घेत घटनास्थळावरून गायब झाले. काही वेळाने गौरवचे आजोबा व चुलते घटनास्थळी आले व जखमी गौरवला तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे करीत आहेत.

परिसरातील वाढत्या मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??