जिल्हाशिक्षणसामाजिक

एस. एम. जोशी महाविद्यालयाचा राज्यस्तरीय गौरव, पूरग्रस्तांना NSS मार्फत मदत ; उच्च व तंत्र शिक्षण विभागाची दखल…

हडपसर (पुणे) : सोलापूरच्या माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर यांनी राबवलेल्या मदतकार्याची राज्य सरकारने दखल घेत पुण्यात महाविद्यालयाचा विशेष सन्मान केला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला.

अतिवृष्टीने उद्भवलेल्या संकटानंतर महाविद्यालयाने माढा येथील कला-वाणिज्य महाविद्यालय दत्तक घेत कपडे, अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत थेट पोहोचवली. NSS विभाग, कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य पार पाडले. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेला उपक्रम राज्यभर आदर्शवत ठरल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गारांत म्हटले.

सन्मान सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य डॉ. साळुंखे, उपप्राचार्य प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. संजय अहिवळेडॉ. तानाजी हातेकर उपस्थित होते.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या सहभागामुळे संकटग्रस्त विद्यार्थ्यांना नव्याने दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??