जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौंड तालुक्यातील दौरा निश्चित ; पाटस येथे कार्यक्रमस्थळाची पाहणी…

ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या तयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती; सुरक्षा, वाहतूक नियोजन व नागरिकांच्या सोयीसुविधांचा आढावा

दौंड (पुणे) : ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा दौंड तालुका दौरा निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाटस येथे कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या स्थळाची पाहणी नुकतीच दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील फुलारी, जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी पोलिस दौंड बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर यांच्यासह विविध संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर यांना स्थळ पाहणीसाठी बाबत चर्चा करण्यात आली यावेळी आमदार राहुल कुल उपस्थित होते.

या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी, नागरिकांच्या सोयीसुविधा व इतर आवश्यक बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक प्रशासनाला नियोजन अधिक काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

पंतप्रधानांचा दौरा लक्षवेधी ठरणार असून या भेटीमुळे दौंड तालुक्याच्या विकास कामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??