महाराष्ट्रराजकीय

पात्र नसलेल्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल करणार ? आदिती तटकरे…

मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील आर्थिक मागास महिलांना दरमहा १५०० रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

          मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी निकष लावले जाणार आहेत. तसेच ज्या महिला अपात्र ठरणार त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊयात.

               काय म्हणाल्या आदिती तटकरे ?

     आदिती तटकरे यांना अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाष्य करताना आदिती तटकरेंनी सांगितले की, ‘लाडकी बहीण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.’

         पुढे बोलताना आदिती तटकरेंनी सांगितले की, ‘लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार नाही, परंतु जर तुम्ही निकषात बसत नसाल तर स्वतः हून पैसे परत करावेत, असं आमचे आवाहन आहे. पैसे करत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकली आहे. अनेक महिलांनी आम्हाला पैसे परत केले आहेत. या योजनेत नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल असंही आदिती तटकरेंनी सांगितले.

             योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

👉🏻लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक
👉🏻राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
👉🏻किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत.
👉🏻सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
👉🏻लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २:५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

                       आवश्यक कागदपत्रे

👉🏻ऑनलाईन अर्ज
👉🏻आधार कार्ड
👉🏻महाराष्ट्र राज्याचे
👉🏻अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
👉🏻उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २:५० लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य).
👉🏻बँक पासबूक
👉🏻पासपोर्ट आकाराचा फोटो
👉🏻रेशनकार्ड
सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र..

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??