जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जिल्हा परिषद सभागृहात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न ; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, अध्यक्ष वीरधवल जगदाळे संतप्त…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एका महिलेने सभागृहात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक, सेवकवर्ग आणि उपस्थित सदस्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले.

चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना ही घटना घडली. अचानक एक महिला सभागृहात आली आणि आरडाओरडा करत स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांनी तत्काळ तिच्या हातातील बाटली हिसकावून घेत महिलेला सभागृहाबाहेर नेले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

घटनेनंतर संबंधित महिलेने माध्यमांशी संवाद साधताना एका जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप केले. मात्र, या आरोपांबाबत सभागृहात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.
या प्रकारानंतर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्वलनशील पदार्थाची बाटली घेऊन एखादी व्यक्ती थेट सभागृहात कशी पोहोचली, असा सवाल अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत प्रवेशद्वारावरील तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान, सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अभिनंदन व शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच नीट (NEET) परीक्षेत देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरवणी अंदाजपत्रकावरील चर्चा सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला.

या घटनेमुळे जिल्हा परिषदेतील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??