जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

गणराज पार्कातून निघालेल्या मिरवणुकीत जयघोष, कदमवाकवस्ती हद्दीमध्ये ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण ; पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे विसर्जन सोहळा शांततेत व जल्लोषात पार…

लोणी स्टेशन चौकातील डिजेची टसल पोलिसांनी वेळीच घातला आवर ; गणराज पार्कासह कदमवाकवस्ती मधील विविध मंडळांच्या मिरवणुकांमुळे परिसर भक्ती व जल्लोषाने दुमदुमला...

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती परिसरात शनिवारी (दि. ६) विविध गणेश मंडळांच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात व भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…”, “गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

 

गणराज पार्क येथील भव्य मिरवणूक…

कवडीपाठ येथील गणराज पार्क मधून सकाळी अकरा वाजता गणेशमूर्तींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मंडळाने यंदा शंकराच्या पिंडीचा देखावा उभारून विशेष आकर्षण निर्माण केले होते. प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत महिलांसह लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत अखेर भावूक वातावरणात एमआयटी येथील विसर्जन घाटावर बाप्पाला निरोप देण्यात आला.

कदमवाकवस्ती येथील विविध मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग…

या विसर्जन सोहळ्यात लोणी स्टेशन येथील श्रीगणेश मित्र मंडळ, मूनलाईट मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळ, संभाजीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळ, कदमवस्ती येथील सम्राट मित्र मंडळ, वाकवस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ तसेच कवडीमाळवाडी गुजर वस्ती येथील विनायक प्रतिष्ठान मंडळ या मंडळांच्या वतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. सर्व मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशे, डीजे आणि आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून मिरवणुकीत उत्साह आणला.

लोणी स्टेशन चौकातील डिजेची टस्सल, काही काळ तणाव…

दरम्यान, लोणी स्टेशन चौकात नेहमीप्रमाणे यंदाही टसलचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक गणपती मंडळ व वाकवस्ती गणपती मंडळ यांच्या मिरवणुका पावणे अकराच्या सुमारास आमनेसामने आल्या. कार्यकर्त्यांनी हातवारे करून आव्हान देण्यास सुरुवात केली तर डीजेचा आवाज ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाला. वाद कधीही चिघळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

लोणी काळभोर पोलिसांचा चोख बंदोबस्त…

ही शक्यता लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळेउरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा चौकात तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून नेमके रात्री १२ वाजता डीजे बंद केला. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि अखेरचा टप्पा शांततेत पार पडला.

कदमवाकवस्ती मधील नागरिकांचा आनंदोत्सव…

गणेश विसर्जन सोहळा यंदा उत्साहात आणि शिस्तबद्ध रितीने पार पडल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे सर्वत्र शांतता राहिली तर मंडळांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??