ताज्या घडामोडी

नियम न पाळल्यास 10 हजार रुपयांचा दंड! वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय..

                                         संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून १० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
           महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर १०,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
          हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास २० दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावावी लागणार आहे.
१ एप्रिलपासून १० हजार रुपयांचा दंड
           जर वाहन चालकांनी या आदेशाचे पालन केले नाही तर मोटार वाहन कायद्यांतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. HSRP नसलेल्यांसाठी वाहनांना वाहन नोंदणी आणि पत्ता बदलणे यासारख्या मिळणाऱ्या सेवा देखील बंद केल्या जाणार आहे. HSRP उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. ज्यामुळे चोरीला गेलेली वाहने परत मिळवला येतील.
HSRP बसवण्यासाठी किती खर्च येईल?
          नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी ७४५ रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
       HSRP कुठे आणि कोण लावणार?
          वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) खूप महत्त्वाची आहे.

           HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.
             HSRP चा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??