क्राईम न्युजजिल्हासामाजिक

महिला पोलिसाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला ; रोख रकमेसह सुमारे ९ लाखांचे दागिने लंपास…

लोणी काळभोर (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील कांबळे वस्ती परिसरात एका महिला पोलिसाच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार (दि. ११ मार्च) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी पुंडलीक तानाजी थोरात (वय ३८, रा. कांबळे वस्ती, थेऊर रोड, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलीक थोरात यांच्या पत्नी अश्विनी पवार या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलगी अनुजा (वय १०) शाळेत गेली, तर अश्विनी पवार या ड्युटीसाठी बाहेर पडल्या. पुंडलीक थोरात हे सेकंड शिफ्ट असल्याने दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कामावर गेले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगी अनुजा शाळेतून घरी परतली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. तिने ही बाब खाली राहणाऱ्या भाडेकरू गौरी खोत यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी तातडीने पुंडलीक थोरात यांना फोन करून माहिती दिली. थोरात तातडीने घरी परतले असता घरातील लोखंडी कपाटाचे कुलूपही तोडलेले दिसून आले आणि घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

कपाटातील लॉकर तपासला असता त्यातील २० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाचे दोन टॉप्स, १० ग्रॅमची चैन, ११ ग्रॅमचे दोन झुमके, १० ग्रॅमची अंगठी, २ ग्रॅमचे दोन बदाम तसेच चांदीचे पैंजण (२ जोड), जोडवे आणि सुमारे २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण चालू बाजारभावानुसार सुमारे ९ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??