जिल्हाशिक्षणसामाजिक

एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘जॉब फेअर २०२५–२६’चे आयोजन ; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध…

हडपसर (पुणे) : रयत शिक्षण संस्था संचलित एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जॉब फेअर २०२५–२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम निर्माण ऑर्गनायझेशन आणि Barclays यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून त्याचा उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ काकडे (सेंटर प्लेसमेंट मॅनेजर, निर्माण ऑर्गनायझेशन), आशिष हिवाळे (सॉफ्ट स्किल ट्रेनर, निर्माण ऑर्गनायझेशन), संतोष स्वामी (एलीऑस मॅनेजमेंट, बार्कलेज) आणि डॉ. कलोल बोस (सॉफ्ट स्किल ट्रेनर, एलीऑस मॅनेजमेंट, बार्कलेज) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे असतील.

तसेच या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती म्हणून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व आमदार चेतन तुपे, सदस्य दिलीप तुपे आणि अमर तुपे उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्यांनुसार योग्य नोकरी मिळवून देणे तसेच करिअरविषयक मार्गदर्शन करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या जॉब फेअरमध्ये विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. संजय अहिवळे आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संगीता यादव कार्यरत असून प्रा. डॉ. किशोर काकडे आणि प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांचेही सहकार्य लाभत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या उद्घाटन समारंभास शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??