जिल्हाशिक्षणसामाजिक

औद्योगिक क्षेत्रात प्रगतीसाठी प्रात्यक्षिक ज्ञान आवश्यक – डॉ. प्रफुल्ल आडकर…

हडपसर (पुणे) : विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर न राहता औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासच त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळू शकते, असे मत डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी व्यक्त केले.

जे. एस. पी. एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांच्या इंडस्ट्री इंटरॅक्शन सेलतर्फे प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा दौरा दि. १० मार्च २०२६ रोजी Rasamrut Ayurved Pharmacy – Maharashtra Arogya Mandal, पुणे येथे पार पडला. या अभ्यास दौर्‍यामध्ये प्रथम वर्षातील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या भेटीदरम्यान कंपनीतील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषधनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, कच्चा माल प्रक्रिया तसेच औषधांच्या गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी विभागप्रमुख योगेश भातांब्रे, प्रॉडक्शन मॅनेजर अनुजा वाटवे, प्रॉडक्शन इन्चार्ज कुणाल पाटील तसेच ॲनालिटिकल केमिस्ट स्वप्निल जगताप यांनी विद्यार्थ्यांना उत्पादन विभाग, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि प्रयोगशाळेतील विविध चाचण्यांची प्रत्यक्ष माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून आयुर्वेदिक औषध उद्योगाविषयी उपयुक्त आणि अद्ययावत माहिती आत्मसात केली. विशेषतः गुणवत्ता तपासणी, पॅकेजिंग प्रक्रिया तसेच आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादन पद्धतींबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान मिळाले.

सदर अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चेतन मामडगे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. तनुजा काशीद तसेच स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार आणि आकांक्षा जाधव यांनी सहकार्य केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??