कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

हवेलीचा ‘पाणंद-शेतरस्ता’ पॅटर्न राज्यभर ; लोणीकंदमध्ये महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा…

हवेली : शेतकऱ्यांच्या पाणंद व शेतरस्त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हवेली तालुक्यात राबविण्यात आलेला अभिनव ‘पाणंद-शेतरस्ता’ पॅटर्न आता राज्यभर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी लोणीकंद येथे केली. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

लोणीकंद (ता. हवेली) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद व शेत रस्ता’ योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेणे बंधनकारक केल्यामुळे गावपातळीवरच शेतरस्त्यांचे प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पाणंद मार्ग आणि शेतरस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यभर मोठ्या प्रमाणावर महसूल सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे सांगताना बावनकुळे यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० हजार संगणकीकृत सातबाऱ्यांचे वाटप, ७५ हजार ‘८ अ’ नोंदी, १ लाख ७५ हजार विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच ‘एक खिडकी’ योजनेअंतर्गत ३४ हजार प्रमाणपत्रे देण्यात आली असून ५०० गावांतील दस्तऐवज दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे ५ लाख कुटुंबांना या शिबिराचा लाभ झाला असून, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.

हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल युवराज काकडे यांच्या संकल्पनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, ग्रामसभांच्या माध्यमातून पाणंद व शेतरस्त्यांवरील अडथळे दूर होऊन स्थानिक पातळीवरच वाद मिटविणे शक्य होईल.

दरम्यान, हवेली तालुक्यात सुमारे १६०० मोजणी प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे यांनी ही सर्व प्रकरणे अवघ्या १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश दिले. “लोकाभिमुख सरकारसाठी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदीप कंद यांनीही हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतरस्त्यांचा प्रश्न सुटणार?

हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणंद, शिवरस्ते आणि शेतरस्ते अतिक्रमणामुळे अडथळ्यात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. मात्र, आता ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागामुळे हे रस्ते लवकरच मोकळे होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??