क्राईम न्युजताज्या घडामोडी

इंदापूर–करमाळ्यातील सराईत वाळूतस्करावर एमपीडीएचा बडगा ; नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध…

पुणे : इंदापूर व करमाळा तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या सराईत वाळूतस्करावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यात आले असून, नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. युवा ऊर्फ विवेक राजेंद्र फलफले (वय ३१, रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मागील पाच वर्षांतील गुन्हेगारी रेकॉर्डचे पुनरावलोकन करून जामिनावर सुटलेले व पुन्हा गंभीर गुन्ह्यांत सहभागी होणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानुसार दरोडे, जबरी चोरी, हायवे लूटमार, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे तसेच अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विवेक फलफले हा दीर्घकाळापासून वाळूतस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे समोर आले.

त्याच्याविरोधात संगनमत करून मारहाण, चोरी, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न तसेच जलमार्गातून अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाचे नुकसान केल्याचे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जुना भारतीय दंड विधान तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.

फलफले हा वारंवार गुन्हे करून परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करत असल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी नमूद करत एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तपासून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठवला.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सविस्तर पडताळणी करून महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा १९८१ (सुधारणा २०२५) अंतर्गत ७ एप्रिल २०२६ रोजी फलफले याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत ८ एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात त्याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे, दत्तात्रय लेंडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच इतर अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवैध वाळू उत्खनन व संघटित गुन्हेगारीविरोधात आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळूतस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??