ताज्या घडामोडी

एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : एम आयटी आर्ट डिझाईन अँन्ड टेक्नालाजी युनिव्हर्सिटी येथे प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धा बँटमवेट, लाईटवेट, वेल्टरवेट, लाईट मिडलवेट, मिडलवेट, लाईट हेवीवेट, क्रूझरवेट आणि हेवीवेट अशा विविध वजन गटांमध्ये पार पडली. उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा गोपाल देवांग तसेच ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त मनोज पिंगळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, तसेच डॉ. अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेनंतर सर्व वजन गटांतील विजेत्यांना सुवर्णपदके, तर उपविजेत्यांना रौप्यपदकांसह एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

या स्पर्धेत राज्यातील विविध नामांकित क्रीडा अकादमींच्या मुष्ठीयोद्ध्यांनी सहभाग घेतला. यात युवा विकास मंच, मनोज पिंगळे क्रीडा अकादमी, नॉकआउट बॉक्सिंग अकादमी, मुंबई बॉक्सिंग अकादमी, स्टार बॉक्सिंग अकादमी, कोंढवा बॉक्सिंग अकादमी, खराळवाडी बॉक्सिंग अकादमी, के.डी. बॉक्सिंग अकादमी, बीएमएसए अकादमी, बीव्हीजीपी बॉक्सिंग अकादमी तसेच डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमी यांचा समावेश होता. स्पर्धेत रंगलेल्या निकराच्या लढतींनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.

स्पर्धेअंती मिडलवेट गटात (७० ते ७५ किलो) के.डी. बॉक्सिंग अकादमी, मुंबईच्या मिथेश राठोड याला ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर हेवीवेट गटात (८५ ते ९० किलो) एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आर्या औटी याला ‘सर्वोत्कृष्ट चॅलेंजर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेमुळे राज्यातील युवा मुष्ठीयोद्ध्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्यास या उपक्रमाचा मोठा हातभार लागणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??