क्राईम न्युजजिल्हासामाजिक

जनगणनेच्या कामास नकार ; लोणी काळभोरमधील पाच शिक्षकांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : केंद्र सरकारच्या जनगणना २०२७ च्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील प्रशासनाच्या आदेशानंतरही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली असून, शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिल्पा राजाभाऊ येरमाळकर, सुनिल दिलीप शेळके, शिवाजी संभाजी गायाकवाड, प्रदीप बबन पारधी आणि शन्नो जॉक्सन गगादे या पाच शिक्षकांविरोधात जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ ची प्रक्रिया सुरू असून, या कामासाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांना आदेश बजावले होते. मात्र, आदेश मिळूनही संबंधित शिक्षकांनी जनगणना कामासाठी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली तसेच काम करण्यास नकार दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

प्रशासनाच्या मते, संबंधित शिक्षकांनी शासनाच्या महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळा निर्माण केला. त्यामुळे अखेर महसूल विभागाने पोलिसांत धाव घेत कायदेशीर कारवाई सुरू केली.

या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??