कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न ; हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

थेऊर (ता. हवेली) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती हवेली आणि अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले विशेष ‘समाधान शिबिर’ शुक्रवारी (दि. ३१) थेऊर येथील आशीर्वाद बँक्वेट हॉल येथे उत्साहात पार पडले. मुसळधार पावसाची संततधार सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.

शिबिराच्या माध्यमातून महसूल विभाग, ग्रामपंचायत, महावितरण, कृषी, सामाजिक न्याय आदी विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध दाखले, प्रमाणपत्रे, महसुली कामे, शासकीय योजनांची माहिती तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेली तालुक्यातील अनियंत्रित नागरीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काही डेव्हलपर्स व बिल्डर्स यांनी विनापरवानगी नैसर्गिक ओढे आणि नाले बुजविल्यामुळे पावसाचे पाणी थेट वाड्या-वस्त्यांमध्ये शिरत असल्याची गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच नदी प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावांमध्ये डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरस्ते व पानंद रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियानाच्या स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भटके-विमुक्त, आदिवासी आणि वंचित समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे, निवारा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १,८०० कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, जमीन व घर नसलेल्या आदिवासी कुटुंबांनाही योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

हवेली तालुक्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक शिवरस्ते आणि पानंद रस्ते खुले करण्यात आले आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी डुडी यांनी केली. तसेच पुरंदर विमानतळासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेत महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. भविष्यातही गावोगावी जाऊन अशाच प्रकारच्या उपक्रमांद्वारे नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रांताधिकारी यशवंत माने आणि तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अभियानाची माहिती देताना सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आतापर्यंत तब्बल ३६ हजार ४०० नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला आहे. जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, पानंद रस्त्यांबाबतची कामे तसेच कार्यालयात प्राप्त होणाऱ्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आदिवासी समाजाचे अध्यक्ष नामदेवराव भोसले यांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, प्रांताधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, पंचायत समिती सभापती युवराज हिरामण काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा हरगुडे, शीतल कांबळे, संदेश आव्हाळे, रमेशबापू हरगुडे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, सुदर्शन चौधरी, कृषिराज चौधरी, राणी वाळके, सुषमा मुरकुटे, संतोष मुरकुटे, महावितरणचे देविदास बैकर, उपभियंता महादेव धाडवे तसेच हवेली तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा, उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, कृषी योजनांची माहिती, महावितरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच नागरिकांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करण्यात आला. महसूल दिनानिमित्त हवेली तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचा सभापती युवराज काकडे व तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या हस्ते गौरव करून सन्मान करण्यात आला.

भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या ‘समाधान शिबिरा’मुळे शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??