जिल्हामहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

लोणी काळभोर येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लोणी काळभोर, (ता. हवेली) : दि.३ ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गवळी होते, तर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश (दादा) बागवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि त्यांच्या साहित्याचा समाजावर झालेला प्रभाव विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हाध्यक्ष दिगंबर जोगदंड आणि जिल्हा परिषद सदस्या शितल सुजित कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर यश मिळविण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर अन्यायाविरुद्ध लढणारे महान समाजप्रबोधक होते. अवघ्या दीड दिवसांचे औपचारिक शिक्षण असूनही त्यांनी आपल्या जिद्द, कष्ट आणि प्रतिभेच्या बळावर अजरामर साहित्य निर्माण केले. त्यांच्या लेखणीतून शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर आल्या.”

ते पुढे म्हणाले, “आजच्या पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. महामानवांच्या जयंती केवळ मिरवणुका, डीजे किंवा दिखाव्यासाठी नसून त्या समाजप्रबोधन, शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि विधायक सामाजिक उपक्रमांद्वारे साजऱ्या व्हायला हव्यात. ‘नाचण्यापेक्षा वाचण्याची संस्कृती’ जोपासणे ही काळाची गरज असून महापुरुषांचे विचार कृतीत उतरवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर, संजय भालेराव, शिवसेना नेते संतोष भोसले, महेश जैनजांगडे, रमेश भोसले, सूर्यकांत आप्पा गवळी, श्रीकांत ओव्हाळ, ॲड. सुजित कांबळे, पंढरीनाथ नामुगडे, सूर्यकांत काळभोर, राहुल जोगदंड, शिवाजी काळभोर यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??