अण्णाभाऊंच्या विचारांचा जयघोष! लोणी काळभोरमध्ये १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कदमवाकवस्ती-कवडीपाट टोल नाका येथे १५ ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. अँड. राहुल झेंडे व ग्रामपंचायत सदस्य सिमींता लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राकेश लोंढे यांच्या प्रयत्नातून ही मिरवणूक काढण्यात आली.
कदमवाकवस्ती-कवडीपाट टोल नाका येथून सुरू झालेली मिरवणूक गुजरवस्ती येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे API सतीश गोडसे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, उदय काळभोर, नितीन लोखंडे, विजय सकट, अभिजित पाचकुडे, युवानेते शब्बीर पठाण यांच्यासह मुख्य सामाजिक कार्यकर्ते हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, कुमार जोगदंड, नितीन टिळेकर, दिगंबर जोगदंड, दिनेश टिळेकर, श्रीधर पवार, आबा चव्हाण, शंकर देडे, रवी पवार, समाधान साळवे, रामा मगर, योगेश आप्पा लोंढे, विष्णू यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य सीमींता अगतराव लोंढे, अँड. राहुल झेंडे आणि लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश लोंढे यांनी केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक बांधिलकी, समाजसेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला नागरिक व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने परिसरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली.
Editer sunil thorat



