जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लोणी काळभोरमध्ये गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन…

कदमवाकवस्ती (ता. हवेली ) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांची बैठक शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आली. यावेळी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध नियम व सुरक्षाविषयक सूचनांचे मार्गदर्शन केले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना व अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या.

यावेळी पोलीस अधिकारी सोनटक्के, पैठणे पोलीस हवालदार रवी आहेर, बापू वाघमारे यांच्यासह पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक पोलीस परवानगी घेणे बंधनकारक असून, स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाच्या एक खिडकी योजनेतून अर्ज करता येईल. तसेच प्रत्येक मंडळाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून धर्मादाय विभागाकडे नोंदणी करून घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.

जबरदस्तीने वर्गणी वसुली नको

गणेश मंडळांनी कोणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, तसेच पुणे-सोलापूर महामार्ग किंवा अन्य रस्त्यांवर वाहने अडवून वर्गणी मागू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आठवडा बाजाराच्या दिवशीही व्यापारी किंवा नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसुली केल्यास तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे मंडळांनी याची विशेष काळजी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले.

मंडपासाठी नियमांचे पालन आवश्यक

मंडप उभारताना संबंधित ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे आहे. रस्त्याचा संपूर्ण भाग अडवून मंडप किंवा स्टेज उभारता येणार नाही. उपलब्ध नियमांनुसार रस्त्याच्या मर्यादित भागाचा वापर करूनच मंडप उभारावा, अशी सूचना करण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप व स्टेज मजबूत आणि सुरक्षित असावेत. मूर्तीची स्थापना सुरक्षित उंचीवर करावी तसेच मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत, इंटरनेट व इतर केबलचा विचार करून मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, असेही सांगण्यात आले.

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई

गणेशोत्सवात डीजे वापरता येणार नसल्याने ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत पोलिसांनी विशेष सूचना दिल्या. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार मंडळांना नोटिसा देण्यात येणार असून, डिजेला परवानगी नसल्याने विना परवाना वाजवू नये तसे आढळल्यास किंवा उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला.

शैक्षणिक संस्था, रुग्णालये व न्यायालयांच्या परिसरातील ध्वनीप्रदूषणाबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पोलिसांकडून अंतिम सूचना मिळेपर्यंत मंडळांनी डीजेचे आगाऊ बुकिंग करून मोठी रक्कम देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले.

मंडळांमध्ये २४ तास कार्यकर्त्यांची नियुक्ती

मूर्ती व मंडपाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मंडळाने पाच कार्यकर्त्यांची २४ तासांसाठी नियुक्ती करावी. मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे रेकॉर्डिंग करणारा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.

मंडप परिसरात जुगार, दारू किंवा अन्य गैरप्रकार होणार नाहीत याची मंडळांनी दक्षता घ्यावी. आग प्रतिबंधक उपाययोजना, आवश्यक अग्निशमन साधने, जनरेटर व बॅटरीची सुरक्षित व्यवस्था करावी. प्रखर हॅलोजन दिवे लावू नयेत, कारण त्यातून पडदे किंवा इतर साहित्याला आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

भावना दुखावणारे देखावे टाळा

गणेशोत्सवातील देखावे, पोस्टर्स किंवा इतर सजावटीच्या माध्यमातून कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुका निर्धारित वेळेत शांततेत पूर्ण कराव्यात. रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करून मिरवणूक लांबवू नये. मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत तारांमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, याचीही मंडळांनी काळजी घ्यावी.

फटाक्यांच्या वापराबाबतही वेळ व आवाजाच्या मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोठ्या आवाजाचे फटाके फोडून नागरिकांना त्रास होणार नाही तसेच आग लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पुढील बैठकीत पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांना पोलीस आयुक्तांकडून देण्यात येणाऱ्या अंतिम सूचना कळविण्यात येतील. त्या सूचनांचे सर्व मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??