आळंदीतील श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळेचा समाजबांधवांना थेट संदेश ; धार्मिक कार्यक्रमांसह समाजकार्यासाठी धर्मशाळेचा लाभ घ्या!

आळंदी (पुणे) : श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा ही महाराष्ट्रातील लोहार समाज बांधवांसाठी श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. धर्मशाळेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी आळंदी येथे उपस्थित राहून या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मशाळेचे अध्यक्ष दिलीप अनंता थोरात यांनी केले आहे.
लोहार समाजासाठी पवित्र स्थानी असलेल्या या धर्मशाळेत धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजाच्या बैठका, विविध कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक उपक्रम आणि समाजहिताच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते. त्यामुळे ही धर्मशाळा केवळ वास्तू नसून समाजाच्या एकजुटीचे आणि संघटनाचे केंद्र असल्याचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धर्मशाळेच्या उर्वरित सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी समाजबांधवांनी स्वेच्छेने आर्थिक अथवा वस्तुरूपात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मशाळेच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील सुमारे १० हजार समाजबांधवांपर्यंत धर्मशाळेचा जमा-खर्च आणि वार्षिक अहवाल पोहोचविला जात असल्याचेही अध्यक्ष थोरात यांनी सांगितले.
“अपप्रचाराला बळी पडू नका ; समाजाची धर्मशाळा ही समाजाचीच संपत्ती आहे. धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि समाजाच्या एकजुटीसाठी उपलब्ध असलेल्या या वास्तूचा समाजबांधवांनी आवर्जून लाभ घ्यावा,” असे आवाहन धर्मशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
धर्मशाळेला मदत करू इच्छिणाऱ्या समाजबांधवांनी बँक ऑफ महाराष्ट्र, आळंदी देवाची शाखा, बचत खाते क्रमांक 20088592245, IFSC : MAHB0000104 या खात्यावर रोख, धनादेश अथवा ऑनलाइन पद्धतीने स्वेच्छेने मदत करावी. देणगीची अधिकृत पावती देण्यात येणार असल्याचे धर्मशाळेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
धर्मशाळेच्या विद्यमान कार्यकारिणीत अध्यक्ष दिलीप अनंता थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब सदाशिव थोरात, सचिव राजेंद्र खंडू दाते, खजिनदार पोपटराव मारुती पवार, विश्वस्त संतोष नानाभाऊ रणसिंग, बी. बी. लोहार व भगवान सोपाना पवार, मार्गदर्शक किसनराव नामदेव बलान्से आणि सल्लागार अशोक मारुती दातार यांचा समावेश आहे.
“समाजाची धर्मशाळा, समाजाचीच जबाबदारी” या भावनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक लोहार समाजबांधवाने आळंदी येथील धर्मशाळेला सदिच्छा भेट द्यावी, धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे आणि धर्मशाळेच्या विकासासाठी आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन अध्यक्ष दिलीप थोरात यांनी केले आहे.
Editer sunil thorat





