
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य राजश्री काळभोर तसेच उदय काळभोर यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणी व वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये कार्ड काढलेल्या तब्बल १ हजार ५०० नागरिकांना NCMC कार्डचे वाटप करण्यात आले.
तसेच विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. गॅलेक्सी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या विविध आरोग्य उपक्रमांमध्ये तब्बल ३ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी उपक्रम राबविण्यात आल्याने ग्रामस्थ व नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशांत काळभोर, नासिर खान पठाण, अनिल टिळेकर, अविनाश पप्पू बडदे, अभिजित पप्पू बडदे, बिना काळभोर, सिमिता लोंढे, सुरेश काळभोर, निलेश काळभोर, ॲड. राहुल झेंडे, शाहीर खुळपे, हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, सतिष काळभोर, नितीन लोखंडे, शिवाजी काळभोर, जयप्रकाश कदम, समीर खान, रमजान तांबोळी, दीपक काळभोर, राणीताई बडदे, नितीन टिळेकर, सुहास काळभोर, शब्बीर पठाण, विजय खेडेकर, अरुण बापू काळभोर, सुभाष काळभोर, सुभाष काळभोर, गुरुदेव काळभोर, ऋत्विक काळभोर, सागर काळभोर, केशव काळभोर, राजू काळभोर, प्रवीण काळभोर, बळवंत काका काळभोर, भास्कर तात्या काळभोर, रवीशेठ काळभोर, माऊली काळभोर, रमेश भोसले, आप्पासाहेब काळभोर, संदीप पवार, गुलाब चौधरी, संजय भोटडे, सागर कांचन, संदीप गोते, रामदास चौधरी, आकाश काळभोर तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat




