आरोग्य

सकाळी शरीरात ‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध, असू शकतात लिव्हरला सूज आल्याचे संकेत…


“द पाॅईंट न्युज 24′ : फॅटी लिव्हर हा आजार खराब जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये ज्या व्यक्तीचा लिव्हरला त्रास होतो त्याच्या लिव्हरमध्ये सूज वाढते.

           लिव्हरला सूज येण्याचे एक प्रमुख कारण अती चरबीयुक्त आहार आहे. तेल किंवा चरबीयुक्त, तळलेले अन्न खातात त्यांना फॅटी लिव्हर रोगाचा धोका असतो. लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचे मुख्य कार्य अन्न पचवणे आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ स्वच्छ करणे हे आहे. याशिवाय लिव्हर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचा संचय करण्यास मदत करते.

         लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा लिव्हरला या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होते. त्याचप्रमाणे, जेव्हा लिव्हरच्या कार्याशी संबंधित समस्या वाढतात, तेव्हा लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. वाढलेल्या चरबीमुळे लिव्हर आकार वाढू लागतो व लिव्हरला सूज येऊ लागते, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. आपण सविस्तर ज्ञजाणून घेऊयात. मनुष्याच्या लिव्हरला सूज वाढण्याची लक्षणे ही सकाळी शरीरात दिसू शकतात.

         लिव्हरला सूज आल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

                 पोटात वारंवार गॅस-

सकाळी उठल्यानंतर पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या जाणवते का? याशिवाय, जर तुम्हाला ॲसिडिटी आणि पोटाला सूज येणे किंवा दुखणे यासारख्या समस्या असतील तर ते फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.

                   लघवीच्या रंगात बदल-

सकाळी जर तुमच्या लघवीचा रंग जाड किंवा गडद पिवळा दिसत असेल तर ते लिव्हरशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा लिव्हरमध्ये सूज वाढते तेव्हा लघवीशी संबंधित अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

                    उलट्या आणि मळमळ-

जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर मळमळ आणि उलट्या सारख्या समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या लिव्हरच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. फॅटी लिव्हर रोगामध्ये उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

                       पोटदुखी

लिव्हरला सूज येणे हे देखील सकाळी पोटदुखीचे कारण असू शकते. कारण, लिव्हरचा आकार वाढल्याने किंवा फॅटी लिव्हरमुळे पोटदुखीची तक्रार वाढू शकते. विशेषतः उजव्या बाजूला आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे ही लिव्हरशी संबंधित समस्या असू शकते.

             लिव्हरवर सूज येण्याची आणखी काही लक्षणे-

वरील लक्षणांसोबतच भूक कमी होणे किंवा भूक न लागणे, सांधे आणि स्नायू दुखणे, दिवसभर थकवा जाणवणे, डोळे आणि नखे पिवळसर होणे, त्वचेवर खाज सुटणे अशी काही लक्षणेसुद्धा दिसून येतात.

(टिप – या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा “द पाॅईंन्ट न्युज 24 दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??