क्राईम न्युज

सोरतापवाडी येथील कालव्यात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांकडून नागरिकांना आवाहन ; उरुळी कांचन..

पुणे (हवेली) : सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुठा उजवा कालव्यात एका ४५ ते ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

        आळंदी म्हतोबाची सोरतापवाडी शिवेवर असलेल्या कॅनॉल ब्रिज जवळ हा मृतदेह आढळून आला आहे.

       उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे हवालदार रमेश भोसले यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

       याप्रकरणी तुषार रामदास चोरगे, (वय ३६, व्यवसाय शेती रा. सोरतापवाडी ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची – सोरतापवाडी शिवेवर असलेल्या कॅनॉल ब्रिज जवळून तुषार रामदास चोरगे हे त्याच्या घरी निघाले होते. यावेळी सोरतापवाडी गावच्या हद्दीत गुंजाळ मळा परिसरातील कॅनॉल ब्रिज जवळ लोकांची गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवून गर्दी का झाली हे पाहण्यासाठी गेले. यावेळी कॅनॉलच्या पाण्यात एक पुरूषाचे प्रेत वाहत आल्याचे दिसून आले.

        तात्काळ तुषार रामदास चोरगे यांनी उरुळी कांचन पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलेश जाधव, गणेश दाभाडे हे पोहोचून पाहणी केली असता एका पुरुषाचा अनोळखी मयत झालेला अंदाजे वय ४५ ते ५०, त्याच्या अंगात फुल भायाचा लाल रंगाचा टि शर्ट, पॅन्ट नसलेली, रंग सावळा, पायात काही एक नाही. टी शर्टवर इंग्रजीमध्ये सी.एच.आय. सी. असे लिहलेला मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाचा पंचनामा पोलीस हवालदार रमेश भोसले यांनी केला.

         मयत इसमाची ओळख पटविण्याचे काम उरुळी कांचन पोलिस करीत असून या बाबत पत्रकार यांना ही बातमी प्रसिद्ध करण्याकामी सांगण्यात आले. कोणास मयत पुरुषाबाबत काही माहिती झाल्यास उरुळी कांचन पोलीस ठाणे ०२०-२६९२६२८७ तसेच पोलीस हवालदार रमेश भोसले – ९८२३६४४७४४ यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

       नागरिकांनी याबाबत माहिती असल्यास पोलीस प्रशासनास कळवावे व सहकार्य करावे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??