क्रीडा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार…

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड ; गुरूवारी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गौरव..

अमरावती : अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलींडरचा स्फोट होण्यापासून रोखणाऱ्या आणि ७० कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या करीना थापाचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सत्कार केला. यावेळी करिना थापाला शिक्षण आणि खेळासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी कटियार यांनी दिले. तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

           जिल्हाधिकारी कार्यालयात कटियार यांनी करिना आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कटियार यांनी थापा कुटुंबियांची माहिती घेतली. करीना हिची शैक्षणिक माहिती तसेच खेळातील अभिरूचीबाबत माहिती घेतली. बॉक्सींग खेळात तिचे प्राविण्य असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिला योग्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. करीनाने शिक्षण आणि खेळामध्ये मेहनत करावी, खेळामध्ये सुरवातीच्या काळात मदत मिळणे कठिण असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे तिला पूर्ण मदत करण्यात येईल, असे सांगितले.

          यावेळी जिल्हाधिकारी यांनी करिना हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच भेटवस्तूही दिल्या. करीनाच्या धाडसाची दखल घेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीनाची निवड केली आहे. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात गुरूवार, (दि. २६) डिसेंबर रोजी समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??