क्रीडा

पदार्पणताच मलेशिया चॅम्पियनशिप रॅली विजेती ठरली निकिता टकले खडसरे..

आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅली जिंकणारी निकिता पहिलीच युवती स्पर्धक..

पुणे : मलेशिया मध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले.

तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.

एम.आय.आर.सी रॅली ऑफ आशान, मलेशिया मध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे २२ स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचनींना निकिताला सामोरे जावे लागले, त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले, रॅली सूरु झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली, कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली, यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत

चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली, सुमारे ३६५ रॅली त्यातील ८६ आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.

दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते, उष्माघात चा त्रास अनेकांना सहन करावा लागला, वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते, अशा परिस्थिती मध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले, मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते, या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे.
पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे.

आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

“द पाॅईंट न्युज 24” https://vedhjanshakticha.in/

फेसबुक https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

इन्स्टाग्राम https://www.instagram.com

डेली हंट https://profile.dailyhunt.in/sunil24

वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी

https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??