क्राईम न्युज

२७ वर्षाची शिक्षिका, तो १७ वर्षाचा, पालकांमध्ये घबराहटीचे वातावरण पुणे हादरले.. सविस्तर बातमी वाचा..

शिक्षिकाची प्रेमाची भुरळ त्यानंतर शरीर संबध ठेवण्यासाठी प्रोत्साहीत केल.. घृणास्पद कृत्य...

पुणे : पुण्यात नक्की चाललंय तरी काय? अशी विचारण्याची वेळ आली आहे. एका मागून एक अशा घटना घडत आहे की विद्येच्या माहेर घरात हे काय सुरू आहे असा प्रश्न पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत असताना आता अशी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे, त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहे.

शिवाय सर्वांना धक्काही बसला आहे. विशेष म्हणजे ही घटना एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे. इथं एका २७ वर्षाच्या शिक्षिकेने १० वीत शिकणाऱ्या १७ वर्षाच्या
विद्यार्थ्याबरोबर असं कृत्य केलं.

हा घृणास्पद प्रकार पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे. विद्यार्थिचे वय १७ वर्षे आहे. याच शाळेत एक शिक्षिका आहे. तिचे वय जवळपास २७ वर्षे आहे. २७ डिसेंबरला हा विद्यार्थी दहावीची सराव परिक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. त्याच वेळी या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेने गळ घातली. त्याला प्रेमाची भुरळ टाकली. त्यानंतर त्याला शरीर संबध ठेवण्यासाठी प्रोत्साहीत केलं. त्याला उत्तेजित केलं.

हा सर्व प्रकार त्यावेळी शाळेतच होत होता. विद्यार्थी उत्तेजित झाल्यानंतर तिनं त्याला शाळेतीलच स्टाफ रूममध्ये नेलं. तिथेच त्याच्यावर अत्याचार केले. स्टाफरुममध्ये काही तरी वाईट सुरू आहे. याची भनक शाळेच्या मुख्याध्यापिकेला लागली. त्याच वेळी त्यांनी तातडीने स्टाफरुममध्ये धडक दिली. त्यानंतर हे दोघे ही नकोत्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तातडीने विद्यार्थ्याच्या पालकांना माहिती देण्यात आली. त्वरित पालक शाळेत दाखल झाले.

याबाबत मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. झालेली संपुर्ण घटना त्यांनी पोलिसांना सांगितली. शिवाय संबधित शिक्षिके विरोधात तक्रार ही दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर संबंधित शिक्षकेला अटकही करण्यात आली आहे. त्या दहावीतल्या विद्यार्थ्या बरोबर आपण शरीर संबध प्रस्थापित केल्याची कबुली संबधित शिक्षिकेने दिले आहे. तिचे मेडीकलही करण्यात आले आहे. त्यानंतर तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

या धक्कादायक कृत्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली. झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. यावेळी पालकांनी झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही शाळेनं घेतली पाहीजे अशी मागणी करण्यात आली. या घटनेने शाळा आणि शिक्षकांवरी विश्वासाला तडा गेला आहे असं मतही काही जणांनी व्यक्त केलं. यानंतर अशा घटना होणार नाहीत असं आश्वासन यानंतर शाळा प्रशासनानं दिलं आहे.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

“द पाॅईंट न्युज 24” https://vedhjanshakticha.in/

फेसबुक https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

इन्स्टाग्राम https://www.instagram.com

डेली हंट https://profile.dailyhunt.in/sunil24

वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी

https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??