ताज्या घडामोडी

शरद पवार यांनी म्हणजे वडीलांनी इ. व्ही. एम. वर आक्षेप घेतला, पण मुलीने म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन …काय म्हणाल्या जाणून घेऊया…

मी ४ वेळा इ.व्ही.एम्.वर निवडून आल्याने त्यावर संशय कसा घेऊ ! - खासदार सुप्रिया सुळे..

पुणे : मी खासदार सुप्रिया सुळे ४ वेळा इ.व्ही.एम्.वर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) निवडून आले आहे. त्यामुळे ‘ इ.व्ही.एम्.’मध्ये घोटाळा आहे, असे मी कसे म्हणू ? अनेक ठिकाणी लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची मते दुसरीकडे गेली आहेत.

त्यामुळे सरकार पारदर्शीपणे काम करत असेल, तर इ.व्ही.एम्. काय किंवा ‘बॅलेट पेपर’वर (छापील मतपत्रिका) निवडणूक घेण्यास सरकारला अडचण काय आहे ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या बारामती तालुक्यातील विविध गावांच्या दौर्‍यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होत्या.

बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी इ.व्ही.एम्.वर संशय व्यक्त केला होता. मी युगेंद्र पवार यांना ‘मत पडताळणी करू नका’, असे सांगितले होते. त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??