ताज्या घडामोडी

एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये खेळाडूंचा सत्कार…

इंदापूर येथे एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या बेसबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या संघाची मिरवणूक...

पुणे (इंदापूर) : (दि.१६) वनगळी-इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बंगलोर येथे शनिवारी (दि.१४) झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. या विजयी संघाच्या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच रथातून भव्य मिरवणूक सोमवारी (दि.१६) काढण्यात आली.

त्यानंतर वनगळी येथे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्येही जल्लोषात रथातून मिरवणूक काढून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून, अमेरिकेसह तो जगभर आता महत्वाचा प्रमुख खेळ समजला जात आहे. एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभर पोहचविले आहे. या संघामध्ये सार्थक माने, सार्थक रोकडे, अभिनव घाडगे, इंद्रनील घोगरे, रेयंश आगलावे, प्रज्वल शेटे, श्रीवर्धन ढुके, विराज भोंग, स्वराज भोंग, यशराज मारकड, रोहन देवकाते, सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे. तर त्यांना क्रीडाशिक्षक साहिल बागवान, सचिन फुले, राहुल धोतरे, सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षिकांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, बेंगलोरहून आगमनप्रसंगी विजयी खेळाडु व प्रशिक्षकांची सोमवारी (दि.16) इंदापूर येथील कला विज्ञान वाणिज्य कॉलेज ते बाजार समिती प्रवेशद्वारापर्यंत रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.

एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये जल्लोषात रथातून मिरवणूक!
या विजेत्या संघाची एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये सोमवारी (दि.१६) रथातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सीईओ संतोष देवकर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.एस. टी. श्रीखंडे, नॅशनल स्कूलचे प्राचार्य शैलेश दरेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी दूरध्वनीवरून खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलला दर्जेदार शिक्षणासाठी पसंती!
बेसबॉल च्या विजेतेपदामुळे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव आता देशपातळीवर पोहोचले आहे. वनगळी-इंदापूर येथे पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. गुणत्तेसाठी व प्लेसमेंटसाठी एस बी पाटील चे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांचे नियोजनाखाली आगामी काळात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषद बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. देवकर यांनी नमूद केले.

संपादक डॉ गजानन टिंगरे 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??