जिल्हाराजकीयसामाजिक

सुरेखा रमेश हरगुडे यांना जिल्हा परिषद तर संतोष (एस.पी.) हरगुडे यांना पंचायत समितीची उमेदवारी ; आमदार ज्ञानेश्वर ‘माऊली’ कटके यांची घोषणा…

काशी–अयोध्या देवदर्शन आशीर्वाद मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारी जाहीर...

हवेली (पुणे) : केसनंद–कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या गटातून सर्वसाधारण महिला गटात सुरेखा रमेश हरगुडे यांना जिल्हा परिषदेची, तर केसनंद पंचायत समिती गणातून सर्वसाधारण पुरुष गटात संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या उमेदवारींची अधिकृत घोषणा शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी अष्टापुर फाटा येथे झालेल्या काशी–अयोध्या देवदर्शन आशीर्वाद मेळाव्यात हजारोंच्या उपस्थितीत केली.

या वेळी बोलताना आमदार कटके म्हणाले, “रमेश (बापू) हरगुडे यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताने विजयी होईल, असा मला विश्वास आहे. अजितदादा पवार, सुनील तटकरे व सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उमेदवार जाहीर केले आहेत.”

मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद (नाना) हरगुडे, शिवसेना तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब चौधरी, प्रभाकर जगताप आदींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेखा रमेश हरगुडेसंतोष (एस.पी.) हरगुडे यांनी आमदार कटके यांचे आभार मानले. “आमदार माऊली आबांच्या मार्गदर्शनाखाली गट व गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे दोन्ही उमेदवारांनी आश्वासन दिले.

प्रास्ताविक करताना मिलिंद (नाना) हरगुडे म्हणाले, “सुरेखाताई आणि एस.पी. हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली गट व गणाचा सर्वांगीण विकास होईल, यात शंका नाही. मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या. हे उमेदवार आपल्या कार्यातून विकासाची नवी दिशा देतील.”

मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रमात “सेवा, विकास आणि समाजातील ऐक्य” यांचा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजवला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??