ताज्या घडामोडी

एस. एम. जोशी कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवकांकडून ‘स्वच्छोत्सव’ मोहीम उत्साहात…

हडपसर (पुणे) : दि. ४ ऑक्टोबर २०२५ रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी दत्तक गाव भोंडवेवाडी येथे “स्वच्छोत्सव” मोहीम राबविली.
ही मोहीम भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या क्षेत्रीय संचालनालय, पुणे यांच्या सूचनेनुसार “एक दिन, एक घंटा, एक साथ” या देशव्यापी श्रमदान उपक्रमांतर्गत पार पडली.

स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी केले. स्वयंसेवकांनी गावातील विविध ठिकाणी स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या आणि श्रमदानाच्या विचारांची जाणीव या मोहिमेद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या उपक्रमात प्रा. स्वप्निल ढोरे यांनी स्वयंसेवकांसोबत प्रत्यक्ष स्वच्छतेचे कार्य केले. यावेळी सरपंच सारिका भोंडवे, उपसरपंच अमित शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष तुषार भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते राहुल नाना भोंडवे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अजित जाधव, डॉ. ज्योती किरवे आणि डॉ. सोपान आयनार यांनी केले. एनएसएसचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??