आरोग्यजिल्हासामाजिक

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्त व्यापक जनजागृती…

लोणी काळभोर (ता. हवेली): हिवताप (मलेरिया) या किटकजन्य आजाराविरुद्ध प्रभावी लढा उभारण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नसून नागरिकांची जागरूकता, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. वर्ष २०३० पर्यंत देशाला हिवतापमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अर्चना पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना हिवताप कसा होतो, त्याची लक्षणे, निदान व उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी घराभोवती साचलेले पाणी नष्ट करणे, पाण्याची टाकी झाकून ठेवणे, स्वच्छता राखणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप आल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी गाव परिसर व आठवडी बाजारातून जनजागृती रॅली काढली. या रॅलीत घोषणाबाजीद्वारे “डासमुक्त परिसर – हिवतापमुक्त समाज” असा संदेश देण्यात आला. नागरिकांमध्ये पत्रके वाटप करून किटकजन्य आजारांविषयी माहिती पोहोचविण्यात आली.

कार्यक्रमात संगीता रोकडे, अनुजा माळी, सारिका भिसे, आरोग्य सहाय्यक अनिल पोळ, समीर पटेल, समीर वाबळे, आदित्य नुले, अमोल चोगले तसेच आशा स्वयंसेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हिवतापाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??