जिल्हासामाजिक

स्वामिनी महिला ग्रामसंघाच्या 9 बचत गटांना 11.70 लाखांचा CIF निधी वाटप…

वार्ताहर – सिताराम बवले

वडगाव घेनंद, : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत स्वामिनी महिला ग्रामसंघ, वडगाव घेनंद अंतर्गत कार्यरत 9 महिला बचत गटांना एकूण 11 लाख 70 हजार रुपयांचा कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (CIF) गुरुवार (दि. 18 जून 2026) रोजी वितरित करण्यात आला.

हा निधी वितरण कार्यक्रम उमेद रणरागिणी महिला प्रभागसंघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी वाडेकर मॅडम, ग्रामसंघाच्या पदाधिकारी तसेच ग्रामसखी नूतन बवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध महिला बचत गटांना त्यांच्या उपजीविका व स्वयंरोजगार उपक्रमांसाठी निधी प्रदान करण्यात आला. श्री स्वामी समर्थ, मातोश्री, प्रेरणा, जागृती, साईसिद्धी, संघमित्रा आणि जय भवानी माता या सात बचत गटांना प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपये, तर धम्मशील व तुळजाभवानी महिला बचत गटांना प्रत्येकी 60 हजार रुपयांचा CIF निधी मंजूर करण्यात आला.
निधी प्राप्त बचत गट व रक्कम :
श्री स्वामी समर्थ महिला बचत गट – ₹1,50,000
मातोश्री महिला बचत गट – ₹1,50,000
प्रेरणा महिला बचत गट – ₹1,50,000
जागृती महिला बचत गट – ₹1,50,000
साईसिद्धी महिला बचत गट – ₹1,50,000
संघमित्रा महिला बचत गट – ₹1,50,000
जय भवानी माता महिला बचत गट – ₹1,50,000
धम्मशील महिला बचत गट – ₹60,000
तुळजाभवानी महिला बचत गट – ₹60,000
एकूण निधी : ₹11,70,000

या निधीमुळे महिला बचत गटांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळणार असून स्वयंरोजगार, लघुउद्योग, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय आणि विविध उपजीविका उपक्रमांना बळकटी मिळणार आहे. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारे असे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामसखी तसेच सर्व महिला बचत गट सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या निधी वाटपामुळे परिसरातील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Editer sunil thorat

 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??