क्राईम न्युज

निवृत्त एसीपी सासऱ्याविरोधात सुनेचा गंभीर आरोप ; शरीरसुखाची मागणी, धमक्या आणि छळप्रकरणी गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका ३० वर्षीय विवाहितेने आपल्या पती, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात मानसिक व शारीरिक छळाची गंभीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सासऱ्याने सुनेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिलेचे वडील मंत्रालयातील उपसचिव पदावरून निवृत्त झालेले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये विक्रांत घाडगे याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून छळास सुरुवात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, पती विक्रांत घाडगे याने पत्नीला घरात कोंडून ठेवणे, तिची नोकरी सोडण्यास भाग पाडणे तसेच तिची सोशल मीडिया खाती बंद करण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार केले. यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले. सासूने तिचे दागिने स्वतःकडे घेतले तसेच माहेरच्या व्यक्तींबाबत अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त एसीपी सुरेश घाडगे हे आपल्या पदाचा आणि पैशाचा धाक दाखवत धमकावत असत. “मी आयुष्यभर गुन्हेगारांमध्ये वावरलो आहे, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला माहिती आहे,” असे सांगून ते दबाव आणत असत. तसेच “आम्ही कायदा विकत घेऊ शकतो, माझ्याकडे बंदूक आहे, तुला जिवंत गाडून टाकू,” अशा धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.

पतीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तसेच त्याने एका परस्त्रीला घरी आणून पत्नीचा अपमान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

८ मे २०२६ रोजी सासरच्या मंडळींनी फिर्यादी आणि तिच्या भावाच्या नातेसंबंधांवर संशय व्यक्त करून त्रास दिल्याचा आरोप आहे. जीवितास धोका असल्याची भीती निर्माण झाल्याने संबंधित महिला माहेरी परतली आणि कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पती विक्रांत सुरेश घाडगे, सासरे सुरेश रामचंद्र घाडगे, सासू सुनंदा सुरेश घाडगे यांच्यासह अकोला येथील स्नेहल प्रवीण सर्जेराव, प्रविण सर्जेराव तसेच मुंबईतील वैशाली विक्रम राऊत आणि विक्रम राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाल करीत आहेत.

टिट : वरील आरोप फिर्यादी महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील असून त्यांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??