क्राईम न्युज

पहाटेचा ‘थरार’, पोलिसांचा ‘प्रहार’! कानिफनाथ घाटातील लुटीप्रकरणी १२ तासांत ३ आरोपी जेरबंद…

फुरसुंगी (पुणे) : कानिफनाथ घाट परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या लुटीच्या गंभीर घटनेचा फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल फोन व इतर मुद्देमालासह सुमारे ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या मित्र आकाश, अथर्व व मैत्रीण खुशी यांच्यासह दोन अॅक्टिव्हा दुचाकींवरून कानिफनाथ मंदिराकडे जात होते. ते सिटी व्ह्यू पॉईंटजवळ पोहोचताच स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून हाताने व दगडाने मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्राकडील दोन मोबाईल फोन तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे १३ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाले.

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी तात्काळ विशेष तपास पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले.

तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला. पोलीस अंमलदार हेमंत कामथे, पोलीस हवालदार सागर वणवे तसेच पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांच्या मदतीने आरोपींचे मोबाईल लोकेशन व हालचालींचा माग काढण्यात आला. त्यानुसार आरोपी कानिफनाथ पायथा, बोपगाव (ता. पुरंदर) परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रतिक दिलीप फडतरे (वय २२), ओंकार सुनील फडतरे (वय २७) आणि गणेश नवनाथ कामठे (वय २७) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल, लुटलेले मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, बापुसाहेब खंदारे, सहाय्यक फौजदार कदम, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वणवे, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, योगेश गायकवाड आणि गणेश शिंदे यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.

सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??