जिल्हासामाजिक

मांजरी बुद्रुकमध्ये अनधिकृत मुरूम व माती साठवणुकीची महसूल विभागाकडून पाहणी ; पंचनामा केल्याची चर्चा…

सर्व्हे क्र. ३६/१ब/२ मधील प्रकरण; अंदाजे १२० ते १३० ब्रास मुरूम-मातीचा साठा असल्याचा दावा...

मांजरी बुद्रुक (हडपसर), दि. २९ : मांजरी बुद्रुक (ता. हवेली, जि. पुणे) येथील सर्व्हे क्र. ३६/१ब/२ मधील कथित अनधिकृत उत्खनन आणि त्यातून काढण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील मुरूम व मातीच्या साठवणुकीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. बांधकामासाठी करण्यात आलेल्या उत्खननातून निघालेला मुरूम व माती आवश्यक शासकीय परवानगीशिवाय शेजारील जागेत साठवण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या निदर्शनास आल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा लोहकरे यांनी कोतवाल व पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून साठवलेल्या मुरूम व मातीचा फोटोसह पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी अंदाजे १२० ते १३० ब्रास मुरूम व मातीचा साठा असल्याचे आढळल्याची चर्चा आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा साठा करूनही त्यासाठी आवश्यक महसूल विभाग अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याचे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात थेऊर मंडल अधिकारी किशोर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “तलाठी सुवर्णा लोहकरे यांनी पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी अहवाल अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या संबंधितांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात येतील.”

दरम्यान, महसूल विभागाकडून या प्रकरणाबाबत अधिकृत अंतिम खुलासा अद्याप झालेला नाही. तसेच संबंधित जमीनधारक किंवा बांधकाम व्यावसायिकांची बाजूही अद्याप समोर आलेली नसल्याने तपासातून नेमके काय निष्पन्न होते आणि प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याच दरम्यान या घटनेची छायाचित्रण करण्यासाठी आलेल्या पत्रकार यांनी माती मिश्रीत वाळू असल्याचे सांगितले. जर माती होती तर ती रातोरात कशी उचलण्यात आली. अशा संशयीत घटनेने संबंधित प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

टीप : या वृत्तातील काही माहिती सूत्रांकडून व स्थानिक चर्चेवर आधारित आहे. महसूल विभागाचा अधिकृत अहवाल किंवा संबंधित पक्षाची भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??