शेवाळवाडी-मांजरी सोसायटी प्रीमियर लीगचे आयोजन ; आमित आण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा…

शेवाळेवाडी (हडपसर): राजे क्लब ट्रस्ट आयोजित तथा शेवाळवाडीचे माजी उपसरपंच आमित (आण्णा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “शेवाळवाडी-मांजरी सोसायटी प्रीमियर लीग” या भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षणाचा विषय ठरणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ₹१५,००० रोख व चषक, तर उपविजेत्या संघाला ₹११,००० रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धा ३ जुलै (सायं. ६.३० वा.), ४ जुलै (दुपारी २.३० वा.) आणि ५ जुलै (दुपारी २.३० वा.) या तीन दिवसांत पार पडणार असून, सामने अस्पयार टर्फ, ग्रँड बे सोसायटी मागे, शेवाळवाडी येथे खेळविण्यात येतील.
स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येक संघात ५ पुरुष व १ महिला खेळाडू असणे अनिवार्य आहे. इच्छुक संघांनी नोंदणीसाठी आयोजकांशी ८८०६०६२५५६ किंवा ९९२२९४२३३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



