आरोग्यजिल्हादेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

डॉक्टरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिकतेने वापर करावा; एआय हा डॉक्टरांचा पर्याय नव्हे तर सक्षम सहाय्यक – डॉ. अदिती कराड…

कदमवाकवस्ती (वा) हवेली , दि. ३ जुलै : “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही डॉक्टरांचा पर्याय नसून एक सक्षम सहाय्यक आहे. डॉक्टरांनी एआयचा नैतिकतेने आणि जबाबदारीने वापर केल्यास निदानाची अचूकता वाढेल, वेळेची बचत होईल आणि रुग्णांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल,” असे प्रतिपादन विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांनी केले.

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये केक कापून डॉक्टरांच्या सेवाभावाचा गौरव करण्यात आला. यावेळी अर्थात ‘मुखवट्यांच्या मागे: आरोग्यदूतांवर उपचार कोण करतो?’ या संकल्पनेवरील विशेष फलकाचे अनावरणही डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाल्या, “सेवाभावातूनच समाजात डॉक्टरांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होतो. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा‘ या ब्रीदवाक्यानुसार प्रत्येक डॉक्टरने कार्य करावे. डॉक्टरांचे कष्ट, करुणा आणि समर्पण हे आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत ऑनलाइन माध्यमे आणि एआयचा प्रभावी वापर केल्यास आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल.”

कार्यक्रमात विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुजीथ कुमार, डॉ. विजय खंडाळे, डॉ. सुषमा आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कातकाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. “डॉक्टरकी हा केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेची जबाबदारी आहे. रुग्णसेवा हेच आमचे व्रत असून टीमवर्क, समर्पण आणि संवेदनशीलता यांच्या बळावरच उत्तम आरोग्यसेवा देता येते,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विश्वराज हॉस्पिटलचे सर्व सल्लागार डॉक्टर, विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हिना पठाण आणि डॉ. यश वाघमारे यांनी केले, तर डॉ. शर्वरी उभरे यांनी आभार मानले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??