जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राम मंदिर लुटीच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये शिवसेनेचे ‘राम रक्षा आंदोलन’; रामरक्षा पठण व महाआरती…

उरुळी कांचन : राज्यातील कथित राम मंदिर लुटीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांनी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केल्यानंतर हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने उरुळी कांचन येथे गुरुवारी ‘राम रक्षा आंदोलन‘ आयोजित करण्यात आले.

या आंदोलनांतर्गत स्थानिक राम मंदिरात रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामाची महाआरती करून राज्यातील राम मंदिरांशी संबंधित कथित गैरव्यवहारांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी धार्मिक वातावरणात श्रीरामाच्या जयघोषासह आंदोलनात सहभाग नोंदविला.

या प्रसंगी हवेली तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील, उरुळी शहर प्रमुख सचिन कांचन, ज्येष्ठ शिवसैनिक आर. डी. कांचन, बाप्पू लाड, महिला आघाडी तालुका प्रमुख छाया महाडीक, उपतालुका प्रमुख अनिल कदम, युवासेनेचे अवधूत राऊत, विभाग प्रमुख शहाजी बनकर, वाहतूक सेनेचे बाळासाहेब भोंडवे, विष्णू नरके, संदेश झेंडे, शुभम चोरगे, बाप्पू गुंजाळ, सुनील कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरांच्या संरक्षणासाठी तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. आंदोलन शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??