जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्वप्नील कुंजीर यांची मागणी; SIR मोहिमेत एकही मतदार वंचित राहू नये, अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करा…

SIR मोहिमेत एकही मतदार वंचित राहू नये; अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करण्याची शिवसेनेची मागणी...

हवेली (पुणे) : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, या उद्देशाने मोहिमेच्या अंतिम तीन दिवसांत प्रत्येक गावात विशेष सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. मात्र, हवेली तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच इतर कारणांमुळे दिवसभर घराबाहेर असतात. अनेक कुटुंबे भाड्याच्या घरात राहत असल्याने त्यांचे वारंवार स्थलांतर होत असते. त्यामुळे BLO घरी भेट देऊनही अनेक पात्र मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होऊ शकत नाही. परिणामी, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची किंवा आवश्यक नोंदणी अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यावर उपाय म्हणून SIR मोहिमेच्या समाप्तीपूर्वीचे अंतिम तीन दिवस प्रत्येक गावात किंवा संबंधित कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी विशेष सुविधा केंद्र सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या केंद्रांवर संबंधित BLO दिवसभर उपस्थित राहतील, अशी व्यवस्था केल्यास ज्या मतदारांचे पुनर्निरीक्षण राहून गेले आहे, त्यांना स्वतः उपस्थित राहून आवश्यक अर्ज भरता येतील, आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील आणि त्यांची पडताळणी पूर्ण करता येईल.

शिवसेनेच्या वतीने असेही नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने अंतिम टप्प्यात विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची गैरसोय टळेल आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहणार नाही.

यासंदर्भात प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक आदेश जारी करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करून नागरिकांना संधी देणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी मांडली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??