जिल्हासामाजिक

युथ आयकॉन अमित अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॉक्स क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ संघांच्या सहभागाने शेवाळेवाडीत क्रिकेटचा जल्लोष…

पुणे, शेवाळेवाडी : युथ आयकॉन अमित अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेवाळेवाडी–मांजरी सोसायटी प्रीमियर लीग २०२६ या भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेला खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. ३ ते ५ जुलै २०२६ या कालावधीत शेवाळेवाडी येथील अस्पायर स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ४८ संघांनी सहभाग नोंदवत मैदानावर चुरशीच्या लढती रंगवल्या. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे शेवाळेवाडी परिसरात क्रीडामय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मांजरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी प्रमुख उपस्थिती लावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक गणेश कामठे, विक्रम दादा शेवाळे, अशोक तात्या शेवाळे, राहुल शेवाळे, निलेश पवार, संदीप दादा शेवाळे, भुजंग शेवाळे, बाळासाहेब भंडारी, छायाताई गदादे, सीमाताई शेंडे, निशाताई थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक केले.

स्पर्धेतील प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी रोमांचकारी ठरला. विशेष म्हणजे डान्सिंग अंपायर एस. पी. गोविंदा यांच्या अनोख्या अंपायरिंग शैलीने संपूर्ण स्पर्धेत वेगळीच रंगत आणली. त्यांच्या हटके शैलीमुळे प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेटनंतर प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मनोरंजनाचाही मोठा उत्सव ठरली.

यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून मागील वर्षाप्रमाणेच यंदाही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात श्रीरामनगर वॉरियर्स संघाने दमदार खेळ करत विजेतेपदावर नाव कोरले, तर टीम स्ट्रायकर्स (शिवचैतन्य कॉलनी) संघाने उपविजेतेपद पटकावले.

विजेत्या श्रीरामनगर वॉरियर्स संघाचे नेतृत्व गणेश ईवरे यांनी केले. संघात पायल ईवरे, ओंकार बारवकर, प्रज्वल हिरवे, ऋषिकेश सुपेकर, रंजीत वीर, ऋतिक सुतार आणि उत्कर्ष इनामदार या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविण्यात मोलाचा वाटा उचलला.

उपविजेत्या टीम स्ट्रायकर्स (शिवचैतन्य कॉलनी) संघाचे नेतृत्व वेदांत कामठे यांनी केले. त्यांच्या संघातील अंजली कामठे, रोहन जाधव, भुवन जाधव, तनमय बारकुंड, स्वरूप गाढवे आणि गणेश राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत दमदार मजल मारली.

स्पर्धेदरम्यान पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा ममता शिवतारे यांनी सदिच्छा भेट देऊन स्पर्धेच्या आयोजनाची पाहणी केली. त्यांनी शिस्तबद्ध नियोजन, खेळाडूंचा उत्साह आणि युवकांचा मोठा सहभाग याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. अमित अण्णा पवार यांनी युवकांना एकत्र आणून समाजोपयोगी आणि क्रीडाप्रेम वाढविणारे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार विजय (बापू) शिवतारे यांनी दूरध्वनीद्वारे आयोजक आणि खेळाडूंशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये खेळाची आवड, संघभावना, शिस्त आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याचे सांगत भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. पायल ईवरे हिने संपूर्ण स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे ‘वुमन ऑफ द सिरीज‘ हा किताब पटकावला, तर रोहन जाधव याने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘मालिकावीर‘ हा बहुमान मिळवला. विजेत्या व उपविजेत्या संघांसह सर्व उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक, सन्मानचिन्हे आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजक अमित अण्णा पवार यांनी सांगितले की, “तरुणांमध्ये खेळाची आवड, संघभावना, बंधुभाव आणि परस्पर प्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर आणि सर्व सहकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धा यशस्वी झाली. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर आणि अधिक आकर्षक स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”

शेवाळेवाडी–मांजरी परिसरातील युवकांना एकत्र आणत क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा यंदाही यशस्वी ठरली असून, खेळाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, मैत्री आणि निरोगी स्पर्धेचा संदेश देण्यात आयोजकांना मोठे यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??