जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

हवालदार भरत सकट यांच्या पुढाकाराने माजी सैनिकांचा भव्य मेळावा; १७ महार रेजिमेंटचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

'सेव्हन्टीन योद्धा ग्रुप'तर्फे १७ महार रेजिमेंटचा ४८ वा स्थापना दिवस पुण्यात उत्साहात साजरा...

पुणे : भारतीय लष्कराच्या शौर्य, शिस्त आणि त्यागाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या १७ महार रेजिमेंटच्या ४८ व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातील घोरपडी येथील सैनिक महा लॉन्स येथे ३० जून व १ जुलै २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘सेव्हन्टीन योद्धा‘ माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य आणि उत्सव समिती २०२६ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील माजी सैनिक, वीरनारी, सैनिकांचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे १७ महार बटालियनमध्ये सेवा बजावताना एकत्र घालवलेल्या आठवणींना उजाळा देणे, निवृत्तीनंतर विखुरलेल्या सहकाऱ्यांना पुन्हा एकत्र आणणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, तसेच पुढील पिढीला महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणे हा होता. याचबरोबर रेजिमेंटप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही या कार्यक्रमामागील महत्त्वाचा हेतू होता.

महार रेजिमेंटचा अभिमानास्पद इतिहास…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे १ ऑक्टोबर १९४१ रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतरच्या १९४७ च्या काश्मीर युद्धापासून १९६२ च्या चीन-भारत युद्धापर्यंत तसेच १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य गाजवले आहे.

रेजिमेंटच्या वीर सैनिकांनी १ परमवीर चक्र, ४ महावीर चक्र, २९ वीर चक्र, २ कीर्ती चक्र, १ अशोक चक्र, परमविशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा पदकासह अनेक राष्ट्रीय सन्मान प्राप्त केले आहेत.

सध्या महार रेजिमेंटमध्ये २२ नियमित बटालियन, ३ टेरिटोरियल आर्मी बटालियन आणि ३ राष्ट्रीय रायफल्स बटालियन कार्यरत आहेत. त्यापैकी १७ महार बटालियन ही धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणारी बटालियन म्हणून ओळखली जाते. १ जुलै १९७९ रोजी मध्य प्रदेशातील मक्रोनिया येथे लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली या बटालियनची स्थापना झाली.

या बटालियनने आजपर्यंत ८ सेना मेडल, ३ विशिष्ट सेवा पदके, २६ COAS व VCOAS प्रशस्तीपत्रे, नंगी टेकडी आणि ग्लेशियर क्षेत्रातील कामगिरीबद्दल २ युनिट सायटेशन तसेच १२६ कमेंडेशन कार्ड्स मिळवून भारतीय सैन्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला पहिला दिवस…

३० जून रोजी आयोजित स्नेहसंमेलनात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चिमुकल्यांची आकर्षक नृत्य सादरीकरणे, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि पारंपरिक ‘बडा खाना’ या विशेष भोजनाचा सर्वांनी आनंद लुटला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या सैनिक सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

शहीदांना मानवंदनेने मुख्य सोहळ्याची सुरुवात…

१ जुलै रोजी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सैनिक स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

उत्सव समितीचे अध्यक्ष हवालदार भरत सकट यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कुमारी तन्वी भिसे आणि चि. विशाल चंदनशिवे यांनी महार रेजिमेंट तसेच भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक वारशाची माहिती प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी वीरनारी श्रीमती संगीता अशोक मस्के यांच्यासह सर्व सैनिक पत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला. लहान बालके आणि ज्येष्ठ माजी सैनिक यांच्या हस्ते स्थापना दिनाचा केक कापण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती…

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मेजर डॉ. शिल्पा खरपकर (सेवानिवृत्त), उपसंचालक, प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, पुणे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन बाबू पोळके (सेवानिवृत्त), १९७१ चे वीर योद्धा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याशिवाय पि. स. ढोबळे (समता सैनिक दल), बुद्धा लक्ष्मण चव्हाण, आबासाहेब ढोले (ACE युनियन राष्ट्रीय कार्यकारिणी), महेश पवार (ACE युनियन कार्यसमिती जनरल सेक्रेटरी), मार्गदर्शक सुभेदार गजानन गवई आणि सुभेदार गुलाब मस्के यांची विशेष उपस्थिती लाभली.

यशस्वी आयोजन…

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम गायकवाड आणि रमेश वाघमारे यांनी केले, तर रामलाल पवार यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी सर्व उपस्थितांनी रेजिमेंटल साँग (महार गाणे) गायले. त्यानंतर ग्रुप फोटो सेशन आणि स्नेहभोजनाने दोन दिवसीय स्थापना दिन सोहळ्याची सांगता झाली.

या यशस्वी कार्यक्रमासाठी सेव्हन्टीन योद्धा माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य आणि उत्सव समिती २०२६ यांनी विशेष परिश्रम घेतले. समितीचे अध्यक्ष हवालदार भरत सकट, सचिव हवालदार काशिनाथ भिसे, कोषाध्यक्ष हवालदार विनोद भोजने आणि सह-कोषाध्यक्ष हवालदार किरण खिल्लारे यांच्यासह सर्व माजी सैनिक सदस्यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

स्थापना दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांनी राष्ट्रसेवा, शौर्य, त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश देत पुढील पिढीनेही देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??