कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

वनहक्क जमिनींना स्वतंत्र सातबारा; दोन लाखांहून अधिक आदिवासी कुटुंबांना दिलासा…

मुंबई : राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मंजूर झालेल्या जमिनींसाठी आता स्वतंत्र सातबारा (गाव नमुना ७ ई) आणि गाव नमुना १२ ई लागू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या निर्णयामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या जमिनीवरील हक्क अधिक सक्षम होणार आहेत.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, आतापर्यंत वनपट्टाधारकांची नावे सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन – वने’ असा उल्लेख असायचा. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतकरी क्रमांक (फार्मर आयडी), बँकांकडून पीककर्ज, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानभरपाई मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या शिफारशींनुसार सरकारने वनपट्टाधारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना ७ ई आणि गाव नमुना १२ ई तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार गाव नमुना ७ ई मध्ये संबंधित वनपट्टाधारकाचे नाव थेट नोंदवले जाईल, तर गाव नमुना १२ ई मध्ये त्या जमिनीवरील पिकांची अधिकृत नोंद केली जाईल. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅकसह विविध कृषी योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि वेगाने मिळू शकणार आहे.

महसूलमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ज्या ठिकाणी वनपट्टे वन ब्लॉक क्षेत्रात देण्यात आले आहेत, त्या भागांचे भूमी अभिलेख विभागामार्फत तातडीने सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनींची स्वतंत्र सातबारा आणि गाव नमुना १२ ई मध्ये अधिकृत नोंद करण्यात येईल.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या मागणीला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी ही माहिती सभागृहात दिली. तसेच हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??